सिंधुदुर्ग today
आमदार नितेश राणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गावागावातून जनसागर कणकवली दाखल.
थोड्यावेळातच श्रीदेव गांगो मंदिर येथून भव्य रॅली उमेदवारी अर्ज भरण्यासाठी होणार रवाना.
भाजप व महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत होणार जाहीर सभा.
कणकवली ( ऋषिकेश मोरजकर)
आपला लाडका आमदार नितेश नारायण राणे यांचा भारतीय जनता पार्टीचा कणकवली,देवगड, वैभववाडी विधानसभेचा अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज सकाळ पासूनच जनता कणकवलीत शहर येवू लागली आहे. कणकवली देवगड वैभववाडी तालुक्यातील सर्वच भागातून हा उस्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. मिळेल ते वाहन पकडून जनता कणकवली शहराकडे येत आहे. सकाळपासूनच गावागावातील भाजप कार्यकर्ते आणि जनता कणकवलीला येऊ लागली.आणि काही वेळातच कणकवली गांगो मंदिर परिसर जनसागराने फुलून गेला. कार्यकर्त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. काही वेळातच ढोल पथकांच्या गजरात आमदार नितेश राणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कणकवली गंगो मंदिर येथून माजी मंत्री नारायणराव राणे, मंत्री रविंद्र चव्हाण,मंत्री दीपक केसरकर,मंत्री विश्वजित राणे,श्री.निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थिती प्रांत कार्यालयापर्यंत भव्य रॅली सुरू होणार आहे.
त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर भव्य जाहीर सभा होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा