सिंधुदुर्ग today



नांदगाव ग्रामपंचायत वतीने कृषी अभ्यास दौरा संपन्न.

कृषी निगडित गावांना दिल्या भेटी.

नांदगाव प्रतिनिधी 

       ग्रामपंचायत नांदगाव च्या वतीने कृषी अभ्यास दौरा काढण्यात आला होता.या अभ्यास दौऱ्याचे नियोजन 15 वित्त आयोगातून करण्यात आले होते या दौऱ्याच्या नियोजनानुसार कृषी विज्ञान केंद्र मुळदे येथे भेट देण्यात आली  तिथे विविध प्रकारची झाडे तसेच शोभिवंत मत्स्यपालन आणि गोड्या पाण्यातील मत्स्यपालन विषयी माहिती घेण्यात आली. 

           मुळदे कृषी विज्ञान केंद्राचे प्राध्यापक श्री नाईक सर यांनी चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांना माहिती दिली मसाल्याच्या पदार्थातील जायफळ सुद्धा आपल्याकडे कोकणात चांगल्या प्रकारे होऊ शकते याची त्यांनी माहिती दिली आणि जायफळ या फळाचे जायफळ व्यतिरिक्त जायफळाला चिकटून असलेला आवरण जायपत्री म्हणून मसाल्याचे पदार्थात वापरता येतं त्याचबरोबर त्याच्या बाहेरील आवरण त्याचं लोणचं पण करता येतं अशा प्रकारे या झाडाचे पूर्ण फळ वापरात येतं अशी माहिती देण्यात आली. त्यानंतर मत्स्यपालनाविषयी प्राध्यापक सहस्त्रबुद्धे यांनीही चांगल्या प्रकारे माहिती दिली. निळेली पशु पैदास केंद्र येथे भेट देण्यात आली तिथे पशुपैदास केंद्राचे श्री कविटकर सर यांनीही उत्तम प्रकारे माहिती दिली आपल्या भागातील देशी गाईची नवीन प्रजाती कोकण कपिला आणि इतरही संकरित जनावरांची माहिती दिली. तसेच कोकण कपिला या गाईला देशावरही चांगल्या प्रकारे मागणी आहे असे सांगण्यात आले. पुन्हा एकदा सर्व लोक त्या त्या भागातील देशी गाईंच संगोपन करण्याकडे कल वाढलेला आहे. गाईंना मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे कोणाला जर कोकण कपिला गाय घ्यायची असेल तर त्यांना निळेली पशु पैदास केंद्रामध्ये अर्ज करावा लागतो आणि लिलाव पद्धतीने वर्षातून एकदा तिथे आपल्याला गाय खरेदी करता येते.निळेली पशु पैदास केंद्रामध्ये कोकण कण्याळ नावाची शेळीची एक नवीन प्रजाती तयार करण्यात आली असून तिलाही चांगल्या प्रकारे मागणी असल्याचं श्री कविटकर सर यांनी सांगितलं आणि कोकण कण्याळ या शेळीच्या प्रजातीलाही मागणी असल्यामुळे कोणाला जर या शेळ्या खरेदी करायचे असतील तर त्या साठीही आपल्याला मागणी अर्ज करावा लागतो आणि जेव्हा शेळ्या उपलब्ध होतील तेव्हा आपल्याला या केंद्राकडून संपर्क साधून शेळ्या उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते. या अभ्यास दौऱ्यामध्ये सखी उत्पादक गट यांच्याकडून गांडूळ खताची माहिती घेण्यात आली अशा प्रकारे या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांना खूप उपयुक्त माहिती मिळाली या दौऱ्यासाठी ग्रामपंचायत नांदगाव च्या माध्यमातून पंधरा वित्त आयोगातून या दौऱ्यासाठी खर्च करण्यात आला जवळपास 37 जण या दौऱ्यामध्ये सहभागी होते सरपंच श्री रविराज मोरजकर उपसरपंच इरफान साटविलकर ग्रामपंचायत अधिकारी श्री आर डी सावंत, मंगेश राणे, ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर, पूजा सावंत रमीजान बटवाले ,नमिता मोरये संतोष बीडये,जैबा नावलेकर गौरी परब, अनिकेत तांबे आणि  शेतकरी राजु तांबे ,सुभाष बिडये, विजय मोरये, प्रवीण बांदिवडेकर ,श्रीकांत नार्वेकर ,मंगेश गुरव , सत्यवान बिडये , बाबा खोत बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today