सिंधुदुर्ग today



विज बिल भरमसाठ वीज मात्र गायब. 

नांदगाव परिसरातील वीज ग्राहक आक्रमक.

काही तास उलटले तरी नांदगाव परिसर अंधारातच. 

हुमरठ येथे ३३ kv लाईन पिन फुटल्याने विज पुरवठा अद्यापही खंडित.

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव परिसरामध्ये कणकवली होऊन येणारी 33 केवी लाईन मधील आज सायंकाळी 4 ते ४.३० च्या सुमारास विजेसह पडलेल्या पावसामुळे पीन  फुटल्याने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झालेला असल्याचे महावितरण कंपनी तर्फे सांगण्यात आले आहे.

जवळपास चार तास होत आले तरीही अद्यापही विज पुरवठा सुरळीत झालेला नाही महावितरण तर्फे या दुरुस्तीचे काम सुरू आहे. वारंवार होणाऱ्या 33 केवी लाईन फॉल्टी यामुळे वीज ग्राहक कमालीचे संतप्त झालेले आहेत. वाढती वीज बिले तसेच थकीत विज बिल यामुळे काही प्रमाणात 

वीज कनेक्शन कट करण्यासही सुरुवात केलेली आहे. यामुळे ग्राहकही संतप्त झाले असून अगोदर आपला वीजपुरवठा सुरळीत करा तसेच वाढीव वीज बिल्ले कमी करा आणि नंतरच वीज बिलांची वसुली व कनेक्शन कट करा अन्यथा पुन्हा एकदा वीज कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा वीज ग्राहक यांच्या वतीने देण्यात येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today