सिंधुदुर्ग today



नांदगाव तिठा येथे देवगड निपाणी महामार्गाचे रस्ता सिमेंट काँक्रीट कामाचा उद्या आम.नितेश राणेंच्या हस्ते शुभारंभ.

देवगड ते फोंडाघाट पर्यंत 64 किलोमीटर अंतरावरील होणार काम. 

३८९ कोटी रुपये मंजूर. 

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

आ.श्री नितेश  राणे यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने देवगड निपाणी रस्ता सिमेंट काँक्रीट करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा उद्या शुक्रवार दिनांक ११ आक्टोबर २०२४ रोजी आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते  सकाळी ठीक 10 वा. नांदगाव तिठा ब्रिज खाली आयोजित करण्यात आला आहे.   या रस्त्यासाठी शासनाकडून 389 कोटी मंजूर करण्यात आले असून देवगड  ते फोंडाघाट पर्यंत 64 किलोमीटर अंतरावरील सिमेंट काँक्रीटकरण होणार आहे.यावेळी सार्वजनिक बांधकाम चे सर्वगोड उपस्थित राहणार आहेत.तसेच या महामार्गावरील सर्व गावातील सरपंच, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

      या होणाऱ्या रस्त्यामुळे या भागात पर्यटकांचा ओघ वाढेल तसेच देवगड या महामार्गावर वाढत्या अपघातांनाही आळा बसेल  सुसज्ज होणाऱ्या या रस्त्यामुळे येथील वाहन धारकांतून , जनतेतून समाधान व्यक्त होत आहे .

  तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघ संयोजक संदीप साटम, कणकवली भाजपचे तालुकाध्यक्ष दिलिप तळेकर, मिलिंद मेस्त्री, देवगड तालुकाध्यक्ष महेश नारकर , रविंद्र शेटये , भारतीय जनता पार्टी चे कणकवली सरचिटणीस पंढरी वायंगणकर यांनी आवाहन केले आहे.

      .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today