सिंधुदुर्ग today



भाजपा अनु .जाती सेलच्या कणकवली  विधानसभा संयोजक पदी संतोष जाधव यांची निवड

कणकवली प्रतिनिधी 

      संतोष जाधव यांची भाजपा अनुसूचित जाती सेलच्या कणकवली  विधानसभा संयोजक पदी निवड करण्यात आली आहे.यांच्या निवडीने अभिनंदन केले जात आहे.

       संतोष जाधव हे मुळ दिगवळे  रांजणवाडी येथील ,परंतू गेली २४ वर्षे ते नांदगाव येथे घर बांधून स्थायिक झाले आहेत . ते केंद्रप्रमुख म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावून सेवानिवृत्त आहेत . जाधव सर हे सेवेत असताना शिक्षक संघटनेत ही त्यांनी जिल्हास्तरावरील महत्वाची पदे भुषविली आहेत .सध्या ते महाराष्ट्र राज्य केंद्र प्रमुख संघ या राज्यस्तरीय संघटनेत राज्य उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत .त्यामुळे त्यांचा लोक संग्रह चांगला आहे .शिवाय ते भारतीय चर्मकार समाज महाराष्ट्र या राज्यस्तरीय सामाजिक संघटनेत सध्या जिल्हा सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत .सेवाकाळात त्यांना आविष्कार फांऊंडेशन या  संघटनेचा राज्यस्तरीय उत्कृष्ट केंद्रप्रमुख म्हणून पुरस्कारही प्राप्त आहे . संपूर्ण जिल्हयात जि .प . चे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांचे ते विश्वासू निकटवर्तीय म्हणूनही परिचित असून युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ - सांगवे या संस्थेचे ते सदस्य व सल्लागार ही आहेत . अभ्यासू , व बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात माझी ज्या पदावर नियुक्ती झाली आहे त्या पदाला मी निश्चितच न्याय देण्यासाठी माझे प्रामाणिक प्रयत्न असणार असल्याचे संतोष जाधव यांनी सांगितले आहे.

      त्यांच्या निवडी बद्दल कासार्डे प्रभागातील भाजपचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी समाधान व्यक्त केले आहे.

या निवडीबाबत भाजपा मंडल अध्यक्ष दिलीप तळेकर,भाजपा तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर , नांदगाव सरपंच , भाई  मोरजकर ,माजी जि.प. सदस्य संजय देसाई , माजी उपसभापती प्रकाश पारकर व  भाजपचे सर्व पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today