सिंधुदुर्ग today
कासार्डे आनंदनगर येथील विश्वास चव्हाण बेपत्ता
कणकवली प्रतिनिधी
कासार्डे आनंदनगर येथील विश्वास रघुनाथ चव्हाण वय ५७ हे मोल मजुरीचे काम मिळते का ? बघून येतो असे सांगून ८ ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता घरातून बाहेर पडले होते. मात्र ते सायंकाळी उशिरापर्यंत घरी परत आले नाही तसेच त्यांचा शोध घेऊनही ते मिळाले नाही त्यामुळे खबर त्यांचा भाऊ विष्णू रघुनाथ चव्हाण यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे विश्वास चव्हाण यांनी अंगात लाल रंगाच्या रेघांचे चौकटी फुल शर्ट, फुल पॅन्ट, उंची पाच फूट दोन इंच, रंग सावळा, बांधा मध्यम ,चेहरा उभट अशा वर्णनाची व्यक्ती दिसल्यास कणकवली पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे यांनी केले आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा