सिंधुदुर्ग today
नांदगाव येथील वारंवार वीज पुरवठा खंडितमुळे जनतेला पाणी पुरवठा करायचा कसा ?
नांदगाव सरपंचांचे ४ नोव्हेंबर रोजी कणकवली महावितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण
ऋषिकेश मोरजकर | कणकवली
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील विजेचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत असून याबाबत किती निवेदन दिली, आंदोलन केली काही उपयोग होत नसल्याने व या होणाऱ्या वारंवार खंडित वीज पुरवठ्यामुळे नांदगाव येथील जनतेला नळ पाणीपुरवठा करू शकत नसल्याने अखेर आज नांदगाव सरपंच रविराज धोंडू मोरजकर यांनी जर येत्या ३१ ऑक्टोबर पर्यंत सुधारणा न झाल्यास ४ नोव्हेंबर रोजी महावितरण विभागीय कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे लेखी स्वरूपात पत्र दिले असून पोलिस निरीक्षक पोलीस ठाणे कणकवली यांना ही कळविण्यात आले आहे.
नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी काल शिष्टमंडळाच्या माध्यमातून सतत ३३ केवी लाईन फॉल्टी मुळे विज पुरवठा खंडित होत असून यामुळे नळ पाणीपुरवठा सतत ठप्प होत असल्याचे लेखी स्वरूपात कळविले होते. मात्र पुन्हा आज सकाळीच विज पुरवठा खंडित झाल्याने नाईलाजास्तव ४ नोव्हेंबर रोजी उपोषणाला बसणार असल्याचे लेखी स्वरूपात पत्र दिले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा