सिंधुदुर्ग today



नांदगाव तिठा येथे देवगड निपाणी महामार्गाचे रस्ता सिमेंट काँक्रीट कामाचा आ.नितेश राणेंच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ.

देवगड निपाणी हा राज्यमार्ग निधीसाठी पालकमंत्र्यांकडे मी हट्ट धरला - आमदार नितेश राणे 

देवगड ते फोंडाघाट पर्यंत ६६ किलोमीटर अंतरावरील होणार काम 

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

आ.श्री नितेश  राणे यांच्या प्रयत्नातून पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्याने देवगड निपाणी रस्ता सिमेंट काँक्रीट करणे या कामाचा भूमिपूजन सोहळा आज  कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या शुभहस्ते नांदगाव तिठा ब्रिज खाली शुभारंभ करण्यात आला आहे . 

     देवगड निपाणी हा राज्य महामार्ग देवगड ते फोंडा घाट पर्यंत दुपदरी तसेच काँक्रिटीकरण करण्यासाठी निधी मंजुर महामार्ग दर्जेदार बनावा  यासाठी पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्याकडे हट्ट धरला. आणि मी हट्ट धरल्यानंतर पालकमंत्र्यांनी माझा हट्ट पूर्ण केला असे मत आमदार नितेश राणे यांनी नांदगाव येथे व्यक्त केले आहे. तसेच हा रस्ता करताना ठेकेदाराने चांगल्या दर्जाचा रस्ता करावा काही अडचण असल्यास आम्हाला सांगावे तसेच कुठल्याही प्रकारे वाहतुकीला जनतेला त्रास होणार नाही याचीही काळजी ठेकेदार यांनी घेऊन आपण रस्ता चांगल्या दर्जाचा बनवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले.या रस्त्यासाठी शासनाकडून ३३१  कोटी मंजूर करण्यात आले असून देवगड  ते फोंडाघाट पर्यंत ६६ किलोमीटर अंतरावरील सिमेंट काँक्रीटकरण होणार आहे. या महामार्गावरील सर्व गावातील सरपंच, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

      या होणाऱ्या रस्त्यामुळे या भागात पर्यटकांचा ओघ वाढेल तसेच देवगड या महामार्गावर वाढत्या अपघातांनाही आळा बसेल  सुसज्ज होणाऱ्या या रस्त्यामुळे येथील वाहन धारकांतून , जनतेतून समाधान व्यक्त होत आहे .

  यावेळी माजी आमदार अजित गोगटे , बाळ खडपे,राजन चिके,मनोज रावराणे, संतोष कानडे, कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघ संयोजक संदीप साटम, कणकवली भाजपचे तालुकाध्यक्ष दिलिप तळेकर, देवगड तालुकाध्यक्ष महेश नारकर ,रविंद्र शेटये,सुरेश सावंत,भाग्यलक्ष्मी साटम ,संजय देसाई, बंड्या नारकर,भारतीय जनता पार्टी चे कणकवली सरचिटणीस पंढरी वायंगणकर ,नांदगाव सरपंच भाई मोरजकर, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके,कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर,ओटव सरपंच तांबे, कोलोशी सरपंच आचरेकर, तोंडवली सरपंच मनाली गुरव, हर्षदा वाळके, प्रणाली माने, प्रियंका साळसकर , प्रदीप हरमळकर, कमलेश पाटील आदी बहुसंख्येने उपस्थित होते ६६ किलोमीटर लांबीचा दुपदरीकरण करणं व महत्वकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन  झाल्याने जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.

      यावेळी सुत्रसंचलन संतोष जाधव प्रास्ताविक संदीप साटम व आभार हर्षदा वाळके यांनी मानले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today