सिंधुदुर्ग today
पहीलं लग्न होऊन ही दोन मुलांची आई दोन मुलांच्या वडीलांबरोबर पश्चिम बंगाल मधून आली पळून.
हवालदार चंद्रकांत झोरे यांनी नांदगाव येथून घेतले संबंधितांना ताब्यात.
कणकवली प्रतिनिधी
दोन मुलांची आई व दोन मुलांच्या वडीलांबरोबर पश्चिम बंगाल मधून कणकवली तालुक्यातील नांदगाव या ठिकाणी मुळ उत्तरप्रदेश चा असलेला व काही महिन्यापासून नांदगाव येथे कामानिमित्त राहत होता. याच्या सोबत पळून आली
सदर दोन मुलांची आई ही २८ सप्टेंबर पासून घरातून गेली ती न आल्याने तिच्या पतीने तेथील पोलीस ठाणे तक्रार दाखल केली होती.
दोघांचाही विवाह अगोदर झालेला असून तिला दोन मुलं तर त्याला ही दोन मुले आहेत. तो मूळचा उत्तरप्रदेश असलेला मात्र सांगली जिल्ह्यातील एका गावात १८ व्या वर्षीपासून राहत होता. यानंतर या दोघांचे इंस्टाग्राम वर सुत जुळले असल्याचे समजते आहे .त्याच अनुषंगाने सदर त्या महिलेचे मोबाईल लोकेशन नांदगाव येथे आल्याने पश्चिम बंगाल पोलिसांनी कणकवली पोलिसांना सूचना केली होती या अनुषंगाने कणकवली पोलीस निरीक्षक श्री मारुती जगताप यांच्या मार्गदर्शन सुचनेनुसार पोलीस हवालदार चंद्रकांत झोरे यांनी नांदगाव येथे राहत असलेल्या ठिकाणांहून त्यांना ताब्यात घेतले आहे. यावेळी नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर उपस्थित होत्या.
सध्या दोघांना हवालदार चंद्रकांत झोरे यांनी कणकवली पोलीसांच्या ताब्यात दिले असून पश्चिम बंगाल मधून पोलीस निघाले असल्याचे समजले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा