सिंधुदुर्ग today
नांदगाव उर्दू शाळेत शिक्षक मागणी करुनही न दिल्याने आजपासून मुलांविना शाळा
शाळेत मुलांना न पाठविण्याचा पालकांचा निर्णय
शिक्षण विस्तार अधिकारी यांची शाळेला भेट
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उर्दू माध्यम शाळेत मागणी करूनही शिक्षक न दिल्याने सर्व पालकांनी आजपासून शाळेत मुलांना न पाठविण्याचा निर्णय घेतलेला आहे आज पासून त्यांनी शाळा बंद आंदोलन पुकारलेले आहे. जोपर्यंत आम्हाला वाढीव शिक्षक मिळत नाही तोपर्यंत शाळेत मुलांना पाठविणार नाही अशी ठाम भूमिका आज शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अल्लाउद्दीन बोबडे उपाध्यक्ष यासीन बटवाले व उपस्थित पालक यांनी मांडली आहे.
यावेळी नांदगाव उपसरपंच इरफान साठविलकर, सर्व पालक वर्ग तसेच महिला पालक वर्ग यांची लक्षणीय उपस्थिती होती.
या दरम्यान कणकवली पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी प्रेरणा मांजरेकर यांनी या शाळेत भेट देत आपण आंदोलन स्थगित करावे अशी प्रशासनाच्या वतीने सर्व पालक वर्गाला विनंती केली आहे.यावेळी त्यांच्या समवेत केंद्र प्रमुख सद्गुरू कुबल, मुख्याध्यापक मुंगी तसेच शिक्षक वृंद उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा