सिंधुदुर्ग today
माणसातला देवमाणूस आमदार नितेश राणे
बावशीच्या दिव्यांग सचिन सावंतचे कृत्रिम पाय बसवण्याचे स्वप्न पूर्ण
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे अपघातात दोन्ही पाय गमावलेल्या बावशी येथील सचिन सावंत या तरुणाच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण करण्याच्या उद्देशाने आमदार नितेश राणे यांनी मदतीचा हात दिला. दोन्ही पायांवर नवे कृत्रिम पाय लागताच तो आधाराविना सर्वसामान्यांसारखे चालू लागला.. आमदार नितेश राणे यांनी यासाठी संपूर्ण आर्थिक भार उचलला..
दीड वर्षांपूर्वी अपघातात दोन्ही पाय निकामी झालेला कणकवली तालुक्यातील बावशी येथील सचिन सावंत हा युवक आमदार नितेश राणे यांना कणकवली निवासस्थानी येऊन भेटला होता. मानसिकदृष्ट्या खचलेला आणि रिक्षातून पण उतरू शकत नसलेल्या सचिन सावंत यांची त्यावेळी आमदार नितेश राणे यांनी रिक्षाजवळ जाऊन आस्थेने विचारपूस केली होती. मुंबईत बोलावून दोन्ही पायांवर उपाययोजना करून दोन्ही पायांवर उभे करण्याचे आश्वासन आमदार नितेश राणे यांनी दिले होते.
त्यानुसार सचिन सावंतला मुंबईत बोलावून प्रसिद्ध नानावटी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला आणि पुढील उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान सचिनवर उत्तम प्रकारचे उपचार व्हावेत यासाठी कृत्रिम पायांची ऑर्डर जर्मनीच्या कंपनीला देण्यात आली. त्यानंतर आता त्याला कृत्रिम पाय बसविण्यात आले. यातून जगण्याची नवी उमेद प्राप्त झाली.
यासंदर्भात बोलताना सचिन म्हणाला, दोन वर्षांपूर्वी ओरोस येथे गावातील एका रुग्णावर उपचार चालू असल्याने त्याला पाहण्यासाठी जात असताना माझा मोठा अपघात झाला. त्या अपघातात पाय गमावल्याने माझी जगण्याची उमेद संपली होती. मात्र आमदार नितेशजी राणे यांनी मदत केल्याने मी आता कृत्रिम पायाने चालू शकणार आहे. दरम्यान सोमवारी मुंबईहून आल्यावर लागलीच आमदार नितेश राणे यांची त्यांच्या येथील ओम गणेश बंगल्यावर सचिन याने आपल्या परिवारासह भेट घेऊन नितेश राणे यांना धन्यवाद दिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा