सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे भिषण अपघातात डेकोरेट साऊंड चे व्यवसायिक रमजान साटविलकर यांचा मृत्यू 

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील देवगड निपाणी राज्य मार्गावर नांदगाव तिठ्या नजीक वाशिनवाडी येथील धोकादायक वळणावर दोन मोटारसायकलच्या धडकेनतंर चिरे वाहतूक करणारा ट्रक खाली सापडून मोटारसायकल स्वार श्री. रमजान साटविलकर  रा. नांदगाव खालची मुस्लिम वाडी हा रस्त्यावर पडल्याने या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा मोटारसायकल चालक अर्जुन विलास जाधव वय 24 रा.नांदगाव वाशिनवाडी याच्या हाताला गंभीर इजा झाली आहे. हा अपघात काल दुपारी 3.30 च्या सुमारास नांदगाव येथे घडला आहे.

    जखमिवर नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारार्थ कणकवली येथे पाठविण्यात आलेले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच नांदगाव परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती . 

    तातडीने कणकवली पोलीस निरीक्षक श्री जगताप यांच्यासह कणकवली पोलीस अपघात स्थळी दाखल होत पंचनामा केला आहे.

       रमजान साटविलकर हा नांदगाव खालची मुस्लिम वाडी येथील रहिवाशी होता. त्याचा मंडप स्पीकर डेकोरेटर्स असा व्यवसाय होता. त्याच्या पश्चात वडील,पत्नी, एक मुलगा ,भाऊ भावजय असा परीवार आहे कुटुंबातील ही कमावती व्यक्ती गेल्याने यांच्या कुटुंबावर दुःखाचा  डोंगर कोसळला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today