सिंधुदुर्ग today
कवी अजय कांडर यांचा युगानुयुग तूच काव्यसंग्रह आता हिंदी मध्ये प्रसिद्ध अनुवादक सुधाकर शेंडगे यांच्याकडून हिंदीत भाषांतर दिल्लीच्या वाणी प्रकाशनतर्फे 'युग युग से तू ही' शीर्षकाने प्रसिद्ध कणकवली/ऋषिकेश मोरजकर एका वर्षात तीन आवृत्या प्रसिद्ध होऊन सर्वाधिक बहुचर्चित ठरलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील कवी अजय कांडर लिखित 'युगानुयुगे तूच ' हा दीर्घ काव्यसंग्रह आता हिंदीमध्ये अनुवादित झाला आहे. प्रसिद्ध अनुवादक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ. सुधाकर शेंडगे यांनी या संग्रहाचे हिंदी भाषांतर केले असून दिल्ली येथील विख्यात वाणी प्रकाशनातर्फे 'युग युग से तू ही ' या शीर्षकांतर्गत आता हा अनुवाद प्रसिद्ध होत आहे.90 नंतरच्या पिढीत कोकणात राहून लिहिणाऱ्या कवींपैकी कवी अजय कांडर यांचा हा एकमेव संग्रह अन्य भाषेत भाषांतरित झाला आहे. लोकवाड:मय गृह प्रकाशित युगानुयुगे तूच हा दीर्घ कवितासंग्रह 2019 मध्ये प्रसिद्ध झाला. प्रकाशन पूर्व पहिली आवृत्ती बुक झालेला हा मराठीतील पहिलाच काव्यसंग्रह. त्यामुळे एका...