सिंधुदुर्ग today



बिअर टिन मध्ये अडकला 

बिवड जातीचा साप...

फोंडाघाट मधील घटना 

कणकवली (ऋषिकेश मोरजकर) 

थंडगार बिअरचा मोह भल्या भल्यांना सोडवत नाही अस म्हणतात.माणूस ते माणूस पण मुक्या जनावरांना ही आकर्षक असणाऱ्या या बिअरच्या टिनचा मोह आवरत नाही.आणि मोह हा नेहमीच अडचणीचा ठरत असतो याचा अनोखा प्रत्यय देणारी ही घटना.आकर्षक दिसणा-या रिकाम्या टिन मध्ये तोंड घालून अंदाज घ्यायचा प्रयत्न करणाऱ्या सापाची चांगलीच फजीती झाली.तोंडावर अडकलेला टिन अशा अवस्थेत काही तास वावरणाऱ्या या सापाची स्थानिक युवकांनी धाडस करत मोठ्या मुश्किलीने सोडवणूक केली.प्राथमिक उपचार करून या युवकांनी त्या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडले.

फोंडाघाट येथील आजूबाजूला जंगलमय भाग असलेल्या एका घराच्या कुंपणात कुत्रे जास्त भुंकू लागल्याने घर मालकाने कानोसा घेतला.कानोसा घेताना समोरचे चित्र पाहून त्या घर मालकाची बोबडीच वळली.एक साप बिअरच्या टिन मध्ये तोंड अडकलेल्या अवस्थेत अंदाजाने चक्क फिरताना दिसला.बराचा वेळ तो साप त्या अवघडलेल्या अवस्थेत दिसल्या नंतर त्या घर मालकाने हेल्प अकॅडमी फोंडाघाट या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेला कळवल.या संस्थेच्या युवकांनी सापाचे रात्री व्यवस्थित रेस्क्यु करत त्या सापाला सुरळीत त्या टिन पासून अलग केले.थोड जखमी झालेल्या त्या सापाला या युवकांनी हळद लावून नैसर्गिक अधिवासात सोडले. बिवड जातीचा हा साप होता.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today