सिंधुदुर्ग today
नांदगाव येथील अपघातातील गंभीर जखमी चे निधन
अनधिकृत मिडलं कट बंद न केल्यास मनसे लाकडी कंपाऊंड घालून बंद करणार
मिडल कट चा प्रश्न पेटणार !
कणकवली प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर नांदगाव
नांदगाव ओटव फाटा खालची मुस्लिम वाडी स्नेहल निवास समोरील मिडल कट मुळे काल सायंकाळी 3.30 च्या सुमारास दुचाकी व नेक्झो कार यांच्यात अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकी स्वार धर्म राज केशव राणे राहणार टेंबवली - देवगड
गंभीर जखमी झाले होते.त्यांचे रुग्णालयात निधन झाले आहे. हा अपघात निव्वळ मिडलकट चालू असल्यामुळे झालेला असून संबंधित यंत्रणा व हायवे प्राधिकरण किती अपघातांची वाट बघणार आहे. असा संतप्त सवाल उपस्थित ग्रामस्थांनी केला आहे.
जर 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत सदर अनधिकृत मिडलं कट बंद न केल्यास मनसे च्या वतीने 21 नोव्हेंबर रोजी लाकडी कंपाऊंड घालून बंद करण्यात येणार असल्याचे मनविसे सिंधुदुर्ग उपजिल्हा अध्यक्ष अनिकेत तर्फे यांनी सांगितले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा