सिंधुदुर्ग today
नांदगाव वासियांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित.
27 नोव्हेंबर रोजी पुन्हा होणार आंदोलन.
आमदार नितेश राणेंनी केली संबंधित यंत्रणेची कानउघाडणी.
नांदगाव ऋषिकेश मोरजकर
नांदगाव वासियांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करुन जर येत्या 15 दिवसांत प्रलंबित कामे मार्गी न लागल्यास पुन्हा
सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर रोजी याही पेक्षा तिव्र स्वरूपात आंदोलन नांदगाव तिठा ब्रिज खाली करण्यात येणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले आहे.
धिक्कार असो धिक्कार असो हायवे प्राधिकरणचा धिक्कार असो, झालेच पाहिजे झालेच पाहिजे प्रलंबित प्रश्न मार्गी
नांदगाव येथील हायवे संदर्भात बरेच प्रलंबित प्रश्न सातत्याने पाठपुरावा करूनही मार्गी लागत नसल्याने आज गुरुवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक १० वाजल्यापासून नांदगाव तिठा ब्रिज खाली आमरण उपोषणाला सुरुवात झाली होती. जवळपास 1 वाजेपर्यंत या उपोषणाकडे संबंधित यंत्रणेने पाठ फिरवली असल्याने आंदोलक आक्रमक होत होते. 1 नंतर श्रीनिवास व कुमावत ,केसीसी चे पांडा हे दाखल होवून संबंधित कामे कशी मार्गी लावण्यासाठी आश्वासन देवू लागले .मात्र याबाबत आंदोलक समाधानी होत नव्हते काही काळ आक्रमक भूमिका घेतली जात होती . आंदोलन दरम्यान आमदार नितेश राणे यांनी दुरध्वनी व्दारे संपर्क साधून संबंधित यंत्रणेची चांगलीच कानउघाडणी केली .व आपण स्वतः नांदगाव येथे कार्यकारी अभियंता जाधव यांना घेऊन येतो .त्यावेळी सर्व ग्रामस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश मोरये, माजी उपसभापती मिलिंद मेस्त्री, माजी पंचायत समिती सदस्या सौ हर्षदा वाळके, माजी सरपंच आफ्रोजा नावलेकर,ओटव माजी सरपंच हेमंत परुळेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष राजू तांबे, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रज्जाक बटवाले, ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर, शंकर मोरये, अनिकेत तांबे,अक्षता खोत,जैबा नावलेकर, रमिजान बटवाले, नमिता मोरये, कमलेश पाटील,दिपक मोरजकर आदी बहुसंख्येने नांदगाव वासिय उपस्थित होते.
यावेळी अभियंता श्री अतुल शिवनिवार,उप अभियंता कुमावत, केसीसी चे पांडा तसेच कणकवली पोलिस यांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.यात स्वतः पोलिस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक हाडळ, पोलिस हवालदार झोरे आदी पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा