सिंधुदुर्ग today



कवी अजय कांडर यांचा युगानुयुग तूच काव्यसंग्रह आता हिंदी मध्ये

प्रसिद्ध अनुवादक सुधाकर शेंडगे यांच्याकडून हिंदीत भाषांतर

दिल्लीच्या वाणी प्रकाशनतर्फे 'युग युग से तू ही' शीर्षकाने प्रसिद्ध

कणकवली/ऋषिकेश मोरजकर 

       एका वर्षात तीन आवृत्या प्रसिद्ध होऊन सर्वाधिक बहुचर्चित ठरलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील कवी अजय कांडर लिखित 'युगानुयुगे तूच ' हा दीर्घ काव्यसंग्रह  आता हिंदीमध्ये अनुवादित झाला आहे. प्रसिद्ध अनुवादक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ. सुधाकर शेंडगे यांनी या संग्रहाचे हिंदी भाषांतर केले असून दिल्ली येथील विख्यात वाणी प्रकाशनातर्फे 'युग युग से तू ही ' या शीर्षकांतर्गत आता हा अनुवाद प्रसिद्ध होत आहे.90 नंतरच्या पिढीत कोकणात राहून लिहिणाऱ्या कवींपैकी कवी अजय कांडर यांचा हा एकमेव संग्रह अन्य भाषेत भाषांतरित झाला आहे.

      लोकवाड:मय गृह प्रकाशित युगानुयुगे तूच हा दीर्घ कवितासंग्रह 2019 मध्ये प्रसिद्ध झाला. प्रकाशन पूर्व पहिली आवृत्ती बुक झालेला हा मराठीतील पहिलाच काव्यसंग्रह. त्यामुळे एकाच वेळी दोन आवृत्ती प्रसिद्ध केल्या गेल्या. त्याही अल्प कालावधीमध्ये संपल्यामुळे तिसरी आवृत्ती एका वर्षभराच्या आत प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर या संग्रहावर अनेक मान्यवरांनी लेखन करून विविध ठिकाणी या संग्रहावर चर्चाही आयोजित करण्यात आली. याच दरम्यान हा संग्रह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे हिंदी विभागाचे प्रोफेसर आणि मराठीतील ख्यातनाम भाषांतरकार सुधाकर शेंडगे यांच्या वाचनात आल्यानंतर त्यांनी या संग्रहाचे भाषांतर करायला प्रारंभ केला होता.दरम्यान संग्रहावर विविध वाड: मयिक नियतकालिके वृत्तपत्रांच्या सांस्कृतिक पुरवण्या आदी माध्यमांमध्ये नामवंत समीक्षकांनी अभ्यासपूर्ण लेखन केले. त्याचा समीक्षा ग्रंथ समीक्षक प्रा. एकनाथ पाटील यांनी संपादित करून तो लोक वाड:मय गृहतर्फे प्रकाशितही करण्यात आला. दरम्यान या संग्रहावर नाटकाचीही निर्मिती झाली असून मुंबई दूरदर्शननेही या नाटकाचा प्रयोग सादर केला होता.

   आता 'युगानुयुगे तूच' या काव्यसंग्रहाचे हिंदीत भाषांतर करण्यात आले असून भाषांतरकार सुधाकर शेंडगे यांनी ते भाषांतर दिल्ली येथील हिंदीतील विख्यात वाणी प्रकाशाकडे पाठविले असता वाणी प्रकाशनाने हा अनुवाद तात्काळ प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या काव्यसंग्रहाचा 'युग युग से तू ही' या शीर्षकाअंतर्गत अनुवाद संग्रह प्रसिद्ध होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today