सिंधुदुर्ग today
नांदगाव वाघाची वाडी येथे उद्या अखंड हरिनाम सप्ताह
कणकवली | ऋषिकेश मोरजकर
कणकवली तालुक्यातील नांदगाव वाघाची वाडी येथे प्रति वर्षाप्रमाणे कार्तिक शुद्ध एकादशी निमित्त यावर्षी उद्या गुरुवार दिनांक 23 नोव्हेंबर २०२३ रोजी श्री विठ्ठल रखुमाई मंदिर अश्वस्थाच्या वृक्षाखाली सात प्रहराचा सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने सकाळी ७ वाजता अभिषेक, सकाळी ९ वा. घटस्थापना,भजने दिनांक २३ नोव्हेंबर सकाळी ९ ते दिनांक २४ नोव्हेंबर सकाळी ९ पर्यंत असणार आहेत. तरी भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री गणेश सेवा मंडळ नांदगाव वाघाची वाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा