सिंधुदुर्ग today
नांदगाव अपघात प्रकरणी
आक्रमक ग्रामस्थांच्या पवित्र्यानंतर हायवे प्राधिकरण दाखल होत बस स्टॉप मागे घेण्याचे दिले आश्वासन
नांदगाव ऋषिकेश मोरजकर
मुंबई गोवा महामार्गावर क्र. 66 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नांदगाव पाटीलवाडी येथे भरधाव कार चालकाचा कार वरील नियंत्रण सुटल्याने थेट येथील दत्तमंदिर बस स्टॉपला धडक देत कार महामार्गावर विरूद्ध दिशेने पटली झाली तर बसस्टॉप जमिनदोस्त होत नुकसान झाले.या अपघातात बसस्टॉप मधील प्रेरणा राजेंद्र तांबे काॅलेज युवतीच्या पायाला गंभीर इजा झाली असून इतरांनी प्रसंगावधान बाळगून बाहेर आल्याने मोठा अघात टळला.सदरचा अपघात सकाळी ८:३० च्या सुमारास घडला. जखमी वर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान अपघात स्थळी आक्रमक भूमिका नांदगाव ग्रामस्थांनी घेतली होती की , हायवे प्राधिकरण चे अधिकारी जोपर्यंत अपघात स्थळी येत नाही तोपर्यंत वाहन हलविणार नसल्याचा पवित्रा घेतला असल्याने अखेर हायवे प्राधिकरणचे अभियंता शिवनिवार व केसीसी कंपनी चे पांडे दाखल होताच उपस्थित ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार सुरु केला बस स्टॉप पूर्वीपासूनच मागे घेण्याची मागणी केली असताना का घेत नाही? अपघाताला जबाबदार कोण ? यामुळे तातडीने सदर बस स्टॉप मागे घेण्यात यावा अशी जोरदार मागणी करत निकृष्ट दर्जाची बस स्टॉप नको आर सी सी बांधण्यात यावी अशी मागणी उपस्थितांमध्ये झाल्यावर अखेर सदर बस स्टॉप मागे घेण्यात येईल व तात्पुरता साधा निवारा शेड बांधून नंतर आरसीसी बांधण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर संबंधित अपघातग्रस्त गाडी हायवे वरून दूर करण्यात आली.यावेळी घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिस निरीक्षक अमित यादव व पोलीस व ट्रॅफिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा