सिंधुदुर्ग today



नांदगाव येथे हायवे संदर्भात

का करावं लागतं पुन्हा पुन्हा आंदोलन ?

संपादकीय...

सिंधुदुर्ग | ऋषिकेश मोरजकर 

मुंबई गोवा हायवे काम जवळपास चार ते पाच वर्षापासून सुरू झाले. हा म्हणताना ब्रिजचे सुद्धा मोठ्या प्रमाणात काम झाले ही पण कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा हायवे लगत असलेल्या नांदगाव येथील हायवे संदर्भात बरेच प्रश्न प्रलंबित आहेत याबाबत कित्येक वेळा ठिय्या आंदोलने झाली उपोषणे झाली, चार दिवस उपोषण ही झाले. आंदोलन वेळी लेखी स्वरूपात आश्वासने संबंधित यंत्रणा देतात पण त्याची पुर्तता कुठे होताना दिसत नाही.पुन्हा एरे माझ्या मागल्या प्रमाणे सुरू आहे. याबाबत संबंधित यंत्रणा ही ठोस पावले उचलून याबाबत तातडीने कार्यवाही करताना दिसत नाही. म्हणूनच समस्थ नांदगाव वासियांना पडलेला मोठा प्रश्न म्हणजे नांदगाव येथे हायवे संदर्भात का करावं लागतं पुन्हा पुन्हा आंदोलन ? याबाबत संबंधित यंत्रणा उत्तर देवू शकते का ? ज्यावेळी आंदोलने होत असताना संबंधित यंत्रणा लेखी स्वरूपात आश्वासने देऊन मोकळी होतात.मग काय होतय ,पुढे पाठवलं,होईलच काही दिवसांतच अशी उत्तरे आता नांदगाव वासियांना काही नवीन नाहीत.ज्यावेळी सर्व्हिस रोड च्या जागेचा प्रश्न सुटला नव्हता त्यावेळी संबंधित यंत्रणा व काय म्हणायची की आठ दिवसात आम्ही हे काम पूर्ण करु .पण ओव्हर ब्रिज सर्व्हिस रोड अंतर कीती त्या अंतरावर गटाराचे काम सुरू होऊन 6 महीने लोटले तरी गटाराचे काम काही पूर्ण होईना ,दिशा दर्शक फलक लावले नाही, प्रवाशांना निवारा शेड अद्याप ही नाही, स्ट्रीट लाईट बंदच, हायवे च्या स्ट्रीट लाईट बिल थकीत मुळे लाईट कापली अशा एकापेक्षा एक समस्या निर्माण झाल्या आहेत. व त्या पुर्णत्वास नेण्यासाठी संबंधित यंत्रणा सकारात्मक नसल्याचे स्पष्ट होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today