सिंधुदुर्ग today



सरस्वती हायस्कूल नांदगावच्या  सेवानिवृत्त शिक्षिका सुजाता व्यंकटेश ठाकूर यांचे निधन.

नांदगाव प्रतिनिधी

कणकवली तालुक्यातील शिवडाव कणकवली येथील सुजाता व्यंकटेश ठाकूर वय 63 यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या नांदगाव येथील सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे मराठी विषयाचे अध्यापन करत असत.  त्या 4 वर्षांपूर्वीच सेवानिवृत्त झाल्या होत्या. अतिशय शांत आणि संयमी मनमिळाऊ स्वभावाच्या मराठी विषयाच्या शिक्षिका म्हणून त्या सर्व विद्यार्थ्यांच्या आवडत्या शिक्षिका होत्या.त्यांच्या पतीचे कोरोना काळात निधन झाले होते.त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली,व एक मुलगा असा परिवार आहे.त्यांच्या या निधनानंतर संस्था चेअरमन नागेश मोरये व मुख्याध्यापक सुधीर तांबे तसेच सर्व शिक्षक वृंद व नांदगाव परिसरातील विद्यार्थी व पालकांनी हळहळ व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today