सिंधुदुर्ग today



शिव प्रतिष्ठान कोळोशीच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम.

कोळोशी ते नांदगाव प्लास्टिक कचरा गोळा करत त्यांची विल्हेवाट लावून प्लास्टिक मुक्तीची दिला संदेश .

नांदगाव | प्रतिनिधी 

शिव प्रतिष्ठान कोळोशीच्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.वर्धापन दिनानिमित्त आदर्श गाव कोळोशी ग्रामपंचायत  येथे शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली.तर कोळोशी ते नांदगाव पर्यंत प्लास्टिक कचरा गोळा करून त्यांची विल्हेवाट लावून प्लास्टिक मुक्तीची संदेश दिला.

      शिवप्रतिष्ठान कोळोशीच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवून येथील मावळ्यांनी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व दिमाखदार पध्दतीने साजरा केला.यावेळी मान्यवरांचे स्वागत समारंभ आयोजित केला होता. त्यानंतर कोळोशी ते नांदगाव प्लास्टिक स्वच्छता अभियान राबवण्यात आले तसेच आयोजित रात्री संयुक्त दशावतार नाट्य मंडळ कणकवली दशावतारी नाटक आयोजित करण्यात आले होते

नाट्यप्रयोगाचे नाव मुंडासुर मर्दिनी हा दशावतारी नाट्यप्रयोग आयोजित केला होता.या‌ नाट्यप्रयोगास रसिकांचा भरभरून प्रतिसाद लाभला.

        यावेळी  शिवप्रतिष्ठान कोळोशीचे अध्यक्ष श्री दत्ताराम अमृते कार्याध्यक्ष विशाल कदम तसेच माजी अध्यक्ष मंगेश जाधव, रोहन इंदप, विजय इंदप,पप्पू टेलर, प्रकाश पावसकर,अतुल गुरव, गणेश कदम, मारुती कदम, सिद्धेश मेस्त्री, विकास इंदप, गणेश मेस्त्री, किशोर गुरव, अनंत शेलार, मंगेश हुंबे, मारुती मेस्त्री तसेच शिवभक्त प्रेम इंदप, शुभम गुरव, मयूर जाधव, प्रतीक इंदप, राज इंदप आदी उपस्थित होते.तर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवप्रतिष्ठान कोळोशीच्या मावळ्यांनी व शिवप्रेमींनी विशेष परिश्रम घेतले.

फोटो.शिवप्रतिष्ठाण कोळोशीच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त प्लास्टिक कचरा गोळा करून विल्हेवाट लावताना मावळे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today