सिंधुदुर्ग today
समस्त नांदगाव वासियांच्या मागणीवरून हायवे संदर्भात आज आमरण उपोषण.
नांदगाव हद्दी मधील सर्व प्रलंबित प्रश्नांची यादीच तयार केली.
सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन.
नांदगाव ऋषिकेश मोरजकर
नांदगाव येथील हायवे संदर्भात बरेच प्रलंबित प्रश्न सातत्याने पाठपुरावा करूनही मार्गी लागत नसल्याने आज गुरुवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक १० वाजल्यापासून नांदगाव तिठा ब्रिज खाली आमरण उपोषण केले जाणार असल्याचा इशारा
नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांनी उपविभागीय अभियंता राष्ट्रीय महामार्ग उपविभाग खारेपाटण यांना लेखी निवेदनाद्वारे दिला होता. त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारे ठोस उपाययोजना न झाल्याने आज सकाळी 10 वाजल्यापासून सदर उपोषण नांदगाव तिठा येथे सुरू होणार आहे. या उपोषणात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत प्रत उपविभागीय अधिकारी कणकवली तसेच पोलीस निरीक्षक कणकवली यांना सादर करण्यात आले आहे.
या उपोषणासाठी नांदगाव हद्दी मधील सर्व प्रलंबित प्रश्नांची यादी काढली असून ही यादीच समोर आलेल्या अधिकारी यांच्या समोर ठेवली जाणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा