सिंधुदुर्ग today
बेळणे खुर्द नवनिर्वाचित सरपंच अविनाश गिरकर यांनी स्वीकारला पदभार
उपसरपंच पदी पंढरीनाथ चाळके यांची बिनविरोध निवड
नांदगाव प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील झालेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत बेळणे ग्रामपंचायत सरपंच म्हणून अविनाश राजाराम गिरकर विजयी ठरले होते . त्यांनी आज सरपंच पदाचा पदभार स्वीकारला आहे. तर उपसरपंच पदी पंढरीनाथ चाळके यांची बिनविरोध निवड झाली आहे.
यावेळी नवनिर्वाचित सदस्य अंकिता भरत चाळके,
राजेंद्र वसंत चाळके,वनिता महादेव मोरजकर,शर्मिला राजेंद्र तांबे,संघवी सुनील तांबे,सिद्धार्थ गंगाराम तांबे,ग्रामसेवक - वैभव ठाकूर तलाठी (निवडणूक अधिकारी)- सापळे मॅडम आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा