सिंधुदुर्ग today



बेळणेत सरपंच पदासाठी तिरंगी तर ओटव मध्ये दुरंगी लढत.

उद्या होणार मतदान. 

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक.

कणकवली  | ऋषिकेश मोरजकर 

कणकवली तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूक उद्या रविवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी  होत आहे. तालुक्यामध्ये ओटव व बेळणे या दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक होत आहेत . तर इतर काही ठिकाणी पोट निवडणूक होत आहेत.

      ओटव व बेळणे सुरुवातीच्या काळात ग्रुप ग्रामपंचायत होत्या. यानंतर दोन्ही गाव विभक्त ग्रामपंचायत म्हणून अस्तित्वात आहेत. या दोन्ही गावाच्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक होत आहे.

   बेळणे  ग्रामपंचायत च्या सरपंच पदासाठी तिरंगी लढत असून भाजपा ,उबाठा शिवसेना व शिंदे शिवसेना अशी तिरंगी लढत होत आहे. तर ओटव ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी भाजप विरुद्ध शिवसेना उबाठा गट अशी दुरंगी लढत पहावयास मिळत आहे. या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये काही सदस्य पदाचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत. तर काही जागांसाठी उमेदवार आमने-सामने निवडणूक रिंगणात उभे टाकले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today