सिंधुदुर्ग Today



मनसे च २१ रोजी कुंपण बांधा आंदोलन

अनधिकृत मिडलं कट बंद न केल्यास मनसे लाकडी कंपाऊंड घालून बंद करणार.

 कणकवली | ऋषिकेश मोरजकर 

कणकवली तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील खारेपाटण ते कणकवली पर्यंत असलेले अनधिकृत मिडलं कट बंद न केल्यास 21 रोजी मनसेच्या वतीने लाकडी कंपाऊंड घालून बंद करणार असल्याचे मनसेचे अनिकेत तर्फे यांनी सांगितले आहे.
नांदगाव ओटव फाटा खालची मुस्लिम वाडी स्नेहल निवास समोरील मिडल कट मुळे काल  सायंकाळी 3.30 च्या सुमारास दुचाकी व नेक्झो कार यांच्यात अपघात झाला या अपघातामध्ये दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागला आहे .याला सर्वस्वी हायवे प्राधिकरण व केसीसी कंपनी जबाबदार आहे.
गंभीर जखमी झाले होते.त्यांचे रुग्णालयात निधन झाले आहे. हा  अपघात निव्वळ मिडलकट चालू असल्यामुळे झालेला असून संबंधित यंत्रणा व हायवे प्राधिकरण किती अपघातांची वाट बघणार आहे. असा संतप्त सवाल उपस्थित ग्रामस्थांनी केला आहे.
       जर 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत सदर अनधिकृत मिडलं कट बंद न केल्यास मनसे च्या वतीने 21 नोव्हेंबर रोजी लाकडी कंपाऊंड घालून बंद करण्यात येणार असल्याचे  मनविसे सिंधुदुर्ग उपजिल्हा अध्यक्ष अनिकेत तर्फे यांनी सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today