सिंधुदुर्ग today
ओटव व बेळणे ग्रामपंचायत निवडणूक शांततेत मतदान
बेळणेत 83.87 तर ओटव 69.98 टक्के मतदान*
आता उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष
नांदगाव ऋषिकेश मोरजकर
कणकवली तालुक्यामध्ये ग्रामपंचायत निवडणूकी साठी आज रविवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी मतदान शांततेत झाले असून तालुक्यामध्ये बेळणेत 83.87 तर ओटव 69.98 टक्के मतदान झाले आहे.इतर ठिकाणी पोट निवडणूक होत आहेत.
बेळणे ग्रामपंचायत च्या सरपंच पदासाठी तिरंगी लढत असून भाजपा ,उबाठा शिवसेना व शिंदे शिवसेना अशी तिरंगी लढत होत आहे तर ओटव ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदासाठी भाजप विरुद्ध शिवसेना उभाठा गट अशी दुरंगी लढत पहावयास मिळत आहे. या दोन्ही ग्रामपंचायतीमध्ये काही सदस्य पदाचे उमेदवार बिनविरोध झाले आहेत तर काही जागांसाठी उमेदवार आमने-सामने निवडणूक रिंगणात उभे टाकले आहेत.
ओटव येथे एकूण मतदार
1) 165 - 125
2) 179 - 107
3)159 - 120
एकूण 503 मतदान पैकी 352 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
बेळणे ग्रामपंचायत निवडणूक
बेळणे प्रभाग क्रमांक 1 / 210 पैकी 178 , प्रभाग क्रमांक 2 /211 पैकी 181, प्रभाग क्रमांक 3 /100 पैकी 78 अशी आकडेवारी असून एकूण 521 पैकी 437 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
यामुळे सर्व उमेदवारांचे भवितव्य मतपेटी बंद झाले असून आता उद्या होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा