सिंधुदुर्ग today
देवगड निपाणी महामार्गावर नांदगाव फोंडा रोडवर भगदाड.
वाहनांना ठरू शकतो धोकादायक
कणकवली ऋषिकेश मोरजकर
देवगड निपाणी राज्य मार्गावर तोंडवली बोभाटेवाडी येथील मोरीवरील रस्त्याला भगदाड पडल्याने वाहनचालकांना हा भाग धोकादायक ठरत आहे.शिवाय येथील संपूर्ण भागच खचल्याने रस्ता कधीही पुर्णपणे खाली ढासळण्याची शक्यता आहे.
गेल्या एक दिड वर्षांपासून तोंडवली बोभाटेवाडी येथील मोरीवरील रस्ता खचलेल्या स्थितीत आहे.मात्र बांधकाम विभागाने नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष करणेच पसंद केले.आता याठिकाणी रस्त्याला भगदाड पडले.मोरी केव्हाही कोसळू शकते.अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.तरी राज्य मार्गासारख्या ठिकाणी तातडीने काम न करता तेवढ्या भागात दगड ठेवून वाहतूक सुरू आहे.यामध्ये अपघात घडल्यावर काम सुरू करणार काय?असा सवाल स्थानिकांकडून केला जात आहे.
देवगड निपाणी राज्य मार्गावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते.चिरे वाहतूक करणाऱ्या १२ आणि सोळा चाकी ट्रक यामध्ये नियमाच्या अधिक भार चेक नाक्यावरच्या आर्शिवादाने सुरुच असते.रस्त्याच्या क्षमतेपेक्षा बोजा अधिक असल्याने हा रस्ता नुतनीकरण झाले तरी जास्त तग धरत नाही.शिवाय कामाचा दर्जा सर्वज्ञात आहे.याबाबत कुठेही तक्रार करा किंवा आणखी काही करा दखल घेणे खूप कमी असते.त्यामुळे सर्व सामान्यांचा प्रवास कायम असाच सुरू असतो.यापुढेही असाच सुरू राहणार.
*संपूर्ण मोरीच धोकादायक*
याठिकाणी खचलेला भाग फक्त वरून खडी डांबराचा मुलामा देऊन होणारा नाही तर पायापासून काम करावे लागेल.कारण खालच्या बाजूने पाईपांच्या मध्ये तडे जाऊन खालील फाऊंडेशनचे दगडच ढासळले आहेत.त्यामुळे पुर्णपणे मोरीच धोकादायक असून कधीही कोसळण्याची शक्यता आहे.
आदत से मजबूर
या मोरीवरील भाग व पाया ढासळण्यास दोन वर्षांपूर्वी सुरवात झाली मात्र जोपर्यंत अपघात घडत नाही तोपर्यंत बांधकाम विभागाला जाग येत नाही.या सवयीने बांधकाम विभाग मजबूर आहे.
... तर चिरे वाहतुक थांबवावी
जर या भागातूनअवजड आणि प्रमाणापेक्षा भार भरून वाहतुक करणारे बारा आणि सोळा चाकी ट्रकची वाहतूक अशीच सुरू राहिल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.मात्र बांधकाम विभाग किती मनावर घेणार यावर अवलंबून आहे.
हे काम लवकर होणे अपेक्षित आहे.अन्यथा अवजड वाहतुकीने भाग पुर्णपणे कोसळून पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देवगड निपाणी राज्य मार्गावर तोंडवली बोभाटेवाडी येथील मोरीवरील रस्त्याला पडलेले भगदाड.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा