सिंधुदुर्ग today



पत्रकाराला धमकी दिल्यापरकरणी कणकवलीतील डॉक्टरवर गुन्हा दाखल

पत्रकार संरक्षण कायद्यानुसार जिल्ह्यातील पहिला गुन्हा 

बातमी लिहिली म्हणून डॉक्टरची पत्रकार भगवान लोके यांना धमकी.

कणकवली / प्रतिनिधी

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गरोदर मातांना प्रसुतीसाठी करावी लागते वणवण

. अशा स्वरुपाची बातमी सिंधुदुर्ग 24 तास या डिजिटल माध्यमात देण्यात आली होती. या डिजिटल माध्यमाचे प्रतिनिधी भगवान लोके यांना फोन करून अपमानास्पद बोलत मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ञ डॉ. अर्पिता महेंद्र आचरेकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्रसारमाध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक) अधिनियम 2017 चे कलम 4 तसेच भादवी कलम 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पत्रकार संरक्षण कायद्यानुसार जिल्ह्यातील पहिला गुन्हा दाखल आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,दिनांक 22 नोव्हेंबर 2023 रोजी सिंधुदुर्ग 24 तास या डिजिटल माध्यमात कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गरोदर मातांना प्रसूतीसाठी वणवण करावी लागते अशा मथळ्याखाली भगवान लोके यांनी बातमी प्रसिद्ध केली होती. ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री 8.46 वाजण्याच्या सुमारास डॉ. अर्पिता आचरेकर यांनी श्री. लोके यांना फोन करून विचारणा केली. यावेळी झालेल्या संभाषणात श्री. लोके यांनी आपण ओपीडीला नव्हता असे सांगितले. यावेळी आपण ओपीडी केली, त्याची लिस्ट आहे. मी तुमच्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकेन, असे सांगत खोटी बातमी देतोस काय? तुला चपलेने हानीन, माझ्या वाटेत जाऊ नको अशा प्रकारे धमकी दिली. डॉ. आचरेकर एवढ्यावरच न थांबता त्यांनी पोलीस स्टेशनवर जाऊन श्री. लोके यांच्या विरोधात बदनामी केल्याप्रकरणी अदखलपत्र गुन्हाही दाखल केला.

यानंतर डॉ. आचरेकर यांनी दिलेल्या धमकीनुसार त्यांच्यापासून आपल्या जीवितास धोका पोहोचेल. त्यांची रुग्ण व रुग्णालयातील नागरिकांची असलेल्या वर्तणुकीबद्दल खूप काही ऐकायला मिळाले आहे. त्यामुळे प्रत्यक्षात धमकीप्रमाणे हिंसाचाराचे कृत्य त्या करतील किंवा करण्याचा प्रयत्न करतील अशी आपल्या मनात भीती निर्माण झाली असल्याची फिर्याद भगवान सुरेश लोके यांनी दिल्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today