सिंधुदुर्ग today
फोंडाघाट-पावणादेवीवाडी येथे कार्तिकी एकादशीनिमित्त संगीत भजन स्पर्धा
नामवंत भजनीबुवांचा सहभाग
कणकवली : कार्तिकी एकादशीनिमित्त २३ नोव्हेंबर रोजी फोंडाघाट-पावणादेवीवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात हरिनाम सप्ताहनिमित्ताने संगीत भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत बुवा सत्यनारायण कळंगुटकर,खेमराज सनाम, अमित तांबुळकर, नागेश पाटिल, लक्ष्मण नेवाळकर, विकास नर,कु.दिव्या गोसावी या नामवंत भजनीबुवांचा सहभाग आहे.
या संगीत भजन स्पर्धेत प्रथम पारितोषिक ७७७७/- रूपये, द्वितीय पारितोषिक ५५५५/-रूपये, तृतीय पारितोषिक ३३३३/- रूपये उत्तेजनार्थ पारितोषिक २२२२/-रू. १२ आकर्षक चषक उत्कृष्ट हार्मोनियम वादक आदी पारितोषिक देण्यात येणार आहेत.तरी या संगीत भजन कार्यक्रमाचा रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा