सिंधुदुर्ग today
कोणताही महामानव आपल्याला वैश्विक भानच देतो. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कवी अजय कांडर यांची प्रकट मुलाखत. विद्यापीठ अभ्यासक्रमात 'युगानुयुगे तूच'च्या हिंदी अनुवादा निमित्त मुलाखत कणकवली/प्रतिनिधी जगातील कोणताही महामानव आपल्याला वैश्विक भानच देत असतो.मात्र आपली विचार दृष्टी तेवढी विस्तारत नसल्यामुळे आपण महामानवांना आपापल्या जातीत जखडून ठेवतो. समाज जात मुक्त करायचा असेल तर प्रथम आज महामानवाना जातीत जखडून ठेवणाऱ्या भक्तांपासून सावध रहायला हवे. आज जातीच्या भक्तांनी महामानवांच्या विचारालाच सुरुंग लावला असून विवेकी समाजाने याचा गंभीर विचार करायला हवा नाहीतर समाजच धोक्यात येईल असे प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने आयोजित केलेल्या मुलाखत कार्यक्रमात केले. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठच्या (छ.संभाजीनगर - औरंगाबाद ) हिंदी एम.ए.च्या अभ्यासक्रमात यावर्षीपासून कवी अजय कांडर यांच्या 'युगानुयुगे तूच ' या दीर्घ कवितेचा 'युग युग से तू ही ' या हिंदी अनुवादाचा समावेश करण्यात आला. यानिमित्त विद्यापी...