सिंधुदुर्ग today




नांदगाव येथे ईद ए मिलाद जलसा मोठ्या उत्साहात.

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

नांदगाव येथे सोमवारी ईद ए मिलादुननबी जलसा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला .नांदगाव येथील दोन्ही गौसिया मस्जिद येथून मिरवणूक काढण्यात आली.  संपूर्ण मुस्लिम मोहल्ला येथून 

नांदगाव तिठा ब्रिज खाली येवून पैगंबर जन्म दिनाच्या तकरीर करण्यात आली या वेळी या मिरवणुकीत शिरखूरमा ,लाडू, समोसे , सरबत , थंडा पेय ,पाणी असे भरपूर प्रमाणात वाटण्यात आले या मिरवणुकीत नारे तकबिर आलाहो अकबर नारे रिसालत या रसुलूला पैगंबर जन्म दिन झिंदाबाद महाराष्ट्र पोलीस झिंदाबाद असे घोषणा देण्यात आल्या 

  या पैगंबर जन्म ईद ए मिलादुननबी जलसा मुबारक निमित्ताने दरवर्षी प्रमाणे यंदाही कणकवली पोलिस निरीक्षक जगताप , ए पि आय सावंत, कासार्डे पोलीस झोरे , किरण मेथे ,  गुरव आदि सर्वांचे शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी पोलिसांनी मुस्लिम बांधव यांना ईद ए मिलादुननबी जलसा च्या शुभेच्छा दिल्या .

   नांदगाव गौसिया मस्जिद येथे लहान मुलांची तकरीर नाते शरीफ दुऑ व मुलांचा सत्कार करण्यात आला .ईद ए मिलादुननबी जलसा निमित्ताने मोठि रोषणाई करण्यात आली शेवटी दुऑ करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today