नांदगावच्या पोलीस पाटील पदी वृषाली ऋषिकेश मोरजकर यांची नियुक्ती 

नांदगाव च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला पोलीस पाटील विराजमान 

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव  पोलीस पाटील पदी नांदगाव येथील सौ. वृषाली ऋषिकेश मोरजकर यांची नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली आहे.

     संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस पाटील यांच्या नियुक्ती जाहीर करण्यात आल्या आहेत याचाच भाग म्हणून नांदगाव येथील ही पोलीस पाटील नियुक्ती  जाहीर करण्यात आली आहे.

    दरम्यान नांदगाव च्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महिला पोलीस पाटील म्हणून पोलीस पाटील पदी विराजमान झाले असल्याने सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

ऑक्टोबर 2023 दरम्यान शासनाकडून पोलीस पाटील भरती निघाली होती. तोपर्यंत नांदगाव गावचा अतिरिक्त कार्यभार बावशी पोलीस पाटील समिर मयेकर यांच्या जवळ होता. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस पाटील भरती प्रक्रिया पूर्ण होऊन  काही महिने नियुक्तीच्या प्रतीक्षेत उमेदवार होते. मात्र गणेश चतुर्थी पूर्वी  नियुक्ती जाहीर करण्यात आल्याने पोलीस पाटील नियुक्ती झालेल्यांना गणपती बाप्पा पावला आहे. कायमस्वरूपी पोलीस पाटील नांदगाव ला मिळाल्याने नांदगाव ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात असून नवनिर्वाचित पोलीस पाटील सौ.वृषाली ऋषिकेश मोरजकर यांचे अभिनंदन केले जात आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today