सिंधुदुर्ग today
नांदगाव येथे ईद ए मिलाद निमित्त विविध कार्यक्रम संपन्न
आशिकाने मुस्तफा सिरत कमिटी तर्फे केले होते आयोजन
३० रक्तदात्यांनी केले रक्तदान
नांदगाव प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे ईद ए मिलाद निमित्त विविध कार्यक्रम आज संपन्न झाले आहे. आशिकाने मुस्तफा सिरत कमिटी तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.यावेळी डॉ विद्याधर तायशेटे यांनी आशिकाने मुस्तफा सिरत कमिटीचे कौतुक करीत आपले कायम सहकार्य लाभेल असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.
रक्तदान शिबीर,नेत्र तपासणी शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, नवनिर्वाचित पोलीस पाटील सत्कार आदी भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
यावेळी संजीवनी हॉस्पिटलचे डॉ. विद्याधर तायशेटे, उपसरपंच इरफान साटविलकर, नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ तृप्ती देसाई, नांदगाव पोलीस पाटील सौ.वृषाली मोरजकर , रज्जाक बटवाले, डॉ सिद्धार्थ तांबे ,लॅब चे राजेश ढगे , आरोग्य सहाय्यक दिपक कांबळे, माजी सरपंच आफ्रोजा नावलेकर, ग्रामपंचायत सदस्या रमिजान बटवाले,कमेटीचे अध्यक्ष आलीम बटवाले,आसिफ बटवाले आदी बहुसंख्येने ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी १० वी १२ वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले. तसेच नांदगाव नवनिर्वाचित पोलीस पाटील सौ. वृषाली मोरजकर यांचा ही शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ऋषिकेश मोरजकर यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा