सिंधुदुर्ग today



नांदगाव नवनिर्वाचित पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांचा  ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार

कणकवली प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील नवनिर्वाचित पोलीस पाटील सौ.वृषाली ऋषिकेश मोरजकर यांचा आज नांदगाव ग्रामपंचायत येथे झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शाल ,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे. 

      यावेळी गेल्या काही महिन्यांपासून अतिरीक्त नांदगाव येथील पोलिस पाटील चार्ज सांभाळला ते बावशी पोलीस पाटील समिर मयेकर यांचा ही शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.

       यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, तंटामुक्त समितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष इमाम नावलेकर, ग्रामविकास अधिकारी आर.डी.सावंत, पंचायत समिती माजी सदस्या हर्षदा वाळके, सर्व ग्रामपंचायत सदस्य ,अंगणवाडी सेविका ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today