सिंधुदुर्ग today
ईश्वरी आंबेरकर हीचे जिल्हास्तरीय रायफल शूटिंग रेंज स्पर्धेत प्रथम
विभागीय स्पर्धेसाठी झेप
कणकवली (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील ईश्वरी आंबेरकर हीने जिल्हास्तरीय रायफल शूटिंग रेंज स्पर्धेत यश मिळवले असून तिने विभागीय स्पर्धेसाठी झेप घेतली आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी व उपरकर शुटिंग रेंज सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत पोदार इंटरनॅशनल स्कूल ची विद्यार्थिनी कु.ईश्वरी गणेश आंबेरकर हीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका राणी मारीया यांनी अभिनंदन केले आहे तसेच सर्व स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे. तसेच तिची पुढे विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे . या तिच्या यशामागे उपरकर शुटिंग रेंज अकॅडमी सावंतवाडी चे प्रशिक्षक कांचन उपरकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले आहे.तसेच शाळेतील क्रिडा शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा