सिंधुदुर्ग today



कवी अजय कांडर यांच्या कवितेवर छ.संभाजीनगर मध्ये २८ रोजी कार्यक्रम

'युगानुयुगे तूच ' अनुवाद संग्रहाचे प्रकाशन, चर्चा आणि विद्यापीठात मुलाखत

कणकवली/प्रतिनिधी

        कवी अजय कांडर यांच्या लोकवाड:मय गृह प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या आणि एकाच वर्षात तीन आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील  'युगानुयुगे तूच' काव्यसंग्रहावर छ.संभाजीनगर (औरंगाबाद) येथे शनिवार २८ रोजी सायं.५ वा.

अनुवाद प्रकाशन, चर्चा आणि त्याच दिवशी स.११ वा.कवी अजय कांडर यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मुलाखत असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

       प्रगतिशील लेखक संघ आणि विवेकानंद महाविद्यालय मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जेष्ठ कवी आणि बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.दासू वैद्य तर या संग्रहावर भाष्य करण्यासाठी सुप्रसिद्ध कवी आणि समीक्षक प्रा.डॉ.पी. पी विठ्ठल यांना निमंत्रित करण्यात आले आहे.कवी कांडर यांचा ' युगानुयुगे तूच' हा दीर्घ कवितासंग्रह वेगवेगळ्या निमित्ताने बहुचर्चित ठरला. सदर संग्रहाची प्रकाशन पूर्व नोंदनी होऊन संग्रह प्रकाशित होण्यापूर्वीच दोन आवृत्त्या एकाच वेळी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. संग्रह प्रकाशित झाल्यावर काहीच दिवसात तिसरी आवृत्तीही प्रकाशित करण्यात आली. या दीर्घ कवितेवरील नाटक मुंबई दूरदर्शनने सादर केले होते. तर सदर दीर्घ कवितेचे अभिवाचन महाराष्ट्राच्या विविध भागात आयोजित करण्यात आले होते. संग्रहावर नामवंत अभ्यासकांनी लेखन केले होते. त्याचा कवी, समीक्षक प्रा. एकनाथ पाटील यांनी संपादित केलेला 'युगानुयुगे तूच संदर्भ आणि अन्वयार्थ ' हा महत्त्वपूर्ण समीक्षा ग्रंथही प्रसिद्ध झाला. त्यानंतर आता 'युगानुयुगे तूच ' या काव्यसंग्रहाचा अनुवाद ज्येष्ठ भाषांतरकार प्रा.डॉ. सुधाकर शेंडगे यांनी केला असून या भाषांतराचा संग्रह ' युग - युग से तू ही ' या शीर्षकाअंतर्गत दिल्ली वाणी प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. त्याचा प्रकाशन सोहळा आणि त्यावरील चर्चा अशा स्वरूपाचा सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.दरम्यान 'युगानूयुगे तूच' या काव्यसंग्रहाचा 'युग - युग से तू ही' हा अनुवादित काव्यसंग्रह या वर्षापासून बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या एम.ए. हिंदीच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला. यानिमित्ताने आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये कवी अजय कांडर यांची मुलाखतही आयोजित करण्यात आली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today