सिंधुदुर्ग today



नांदगाव विभागात पुन्हा वारंवार वीज पुरवठा खंडित; गणेश उत्सव काळात नळ पाणीपुरवठा बंद 

वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास उद्या दुपार पर्यंत विज कार्यालयाला टाळे ठोकणार ; पंढरी वायंगणकरांचा इशारा .

कणकवली (ऋषिकेश मोरजकर)

नांदगाव दशक्रोशीतील वीज वितरण च्या एवढ्या समस्या आहेत यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होणे 33 केवी लाईन फॉल्टमुळे परिसरातील ग्रामपंचायतच्या असलेल्या नळ पाणीपुरवठ्यावर याचा विपरीत परिणाम झालेला आहे गेले तीन ते चार दिवस नळ पाणीपुरवठा योजना बंद आहे यामुळे गणेशोत्सव काळात पाणी असूनही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे संतप्त झालेल्या वीज ग्राहकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया असून पूर्ण बिलांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तसेच दोन दिवसांवर गणेश चतुर्थी आल्याने  जर उद्या दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास वीज कार्यालयाला टाळ्या ठोकण्याचा इशारा खरेदी-विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर यांनी दिलेला आहे.

      नांदगाव दशक्रोशीतील वीज समस्येबाबत गेल्या महिन्यातच सर्व दशक्रोशीतील वीज ग्राहकांचे तीव्र आंदोलन झाले होते यावेळी महिन्याभरात विज पुरवठा सुरुळीत पणे होण्याचे लेखी आश्वासन संबंधित विभागाने दिले होते. मात्र कोणत्याही प्रकारे सुरळीतपणा आलेला दिसून येत नाही उलट जास्त समस्या वाढल्याने त्याचा नाहक त्रास विज ग्राहकांना सहन करावा लागत आहे जर उद्या दुपारपर्यंत पुरवठा सोडून झाल्यास कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा खरेदी विक्री संघाच्या संचालक पंढरी वायंगणकर यांनी दिलेला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today