सिंधुदुर्ग today



कासार्डे प्रभागातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दूत ठरलेल्या ताईंचा सत्कार समारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठरला पहिला

पंढरी वायंगणकर यांच्या वतीने करण्यात आले होते आयोजन 

लाडकी बहीण समिती अध्यक्षा संजना सावंत यांनी पंढरी वायंगणकर यांना लाडका भाऊच म्हणत केले कौतुक 

नांदगाव ( ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील कासार्डे प्रभागातील सर्व गावातील  कासार्डे प्रभागातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दूत ठरलेल्यांचा सर्वांचा सत्कार  खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरी वायंगणकर यांच्या वतीने आज असलदे येथील गौरी मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता . 

         या सत्कार सोहळ्यात एकूण 110 व्यक्तींचा सत्कार करण्यात आला .यामध्ये अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गट सिआरपी,यांचा समावेश आहे.

असून या योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सत्काराचा पहिलाच कार्यक्रम या विभागात ठरला असल्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सिंधुदुर्ग समिती अध्यक्षा संजना सावंत यांनी आयोजक पंढरी वायंगणकर यांचे कौतुक करीत लाडका भाऊच ठरला असल्याचे गौरवोद्गार काढले आहे.

        सदर या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री लाडके बहीण योजना समिती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संजना सावंत यांच्या शुभहस्ते दीपपूजन करून करण्यात आले. 

      यावेळी संजना सावंत बोलताना पुढे म्हणाल्या की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पर्यंत बऱ्याच महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा झालेले आहेत तर काही लाभार्थी हे त्यांच्या त्रुटींमुळे राहीले असून तेही काही दिवसांत पूर्ण होतील व संपूर्ण जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होईल असा विश्वास ही सौ. सावंत यांनी व्यक्त केला असून ही योजना भविष्यात ही सुरू राहणार असून यामुळे सामान्य महिलांचे चेहरे फुलले असल्याचे शेवटी सांगितले आहे.

    यावेळी असलदे चेअरमन भगवान लोके म्हणाले,राज्यातील महायुतीच्या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे.त्याची प्रभावी अंमलबजावणी कणकवली विधानसभा मतदारसंघात झाली आहे,त्याचे श्रेय आ.नितेश राणे यांना जात आहे.त्याच बरोबर या योजनेच्या अध्यक्षा संजना सावंत सातत्याने पाठपुरावा करत जास्तीत जास्त महिलांना लाभ देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार पंढरी वायंगणकर यांच्या पुढाकाराने झाला,त्यामुळे तुमच्यावर या योजनेपासून वंचित राहिलेल्या महिलांना लाभ मिळवून देण्यासाठी जबाबदारी आहे.ज्या ठिकाणी अडचणी असतील तिथे आम्ही सर्व भाऊ म्हणून उभे राहू,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

      यावेळी व्यासपीठावर आयोजक पंढरी वायंगणकर, हर्षदा वाळके,  असलदे सरपंच चंद्रकांत डामरे,नांदगाव सरपंच भाई मोरजकर,कासार्डे सरपंच निशा नकाशे उपसरपंच गणेश पाताडे,तोंडवली बावशी सरपंच मनाली गुरव, कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, असलदे सोसायटी चेअरमन भगवान लोके,व्हाईस चेअरमन दयानंद हडकर , ओटव माजी सरपंच हेमंत परुळेकर,आयनल माजी सरपंच संतोष वायंगणकर, नांदगाव माजी सरपंच आफ्रोजा नावलेकर,असलदे तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष मनोहर खोत, नांदगाव राजू तांबे, माजी सरपंच सुरेश लोके, संतोष जाधव, रघुनाथ लोके, संतोष घाडी,पर्शुराम परब , बाबाजी शिंदे,पप्पी सापळे,प्रदीप हरमळकर, ग्रामविकास अधिकारी आर.डी.सावंत , मंगेश राणे,  कमलेश पाटील,गौस साटविलकर, ग्रामपंचायत सदस्या जैबा नावलेकर, सौ. मनाली वायंगणकर,बचत गट सिआरपी सुषमा सावंत रिया जाधव , मनिषा परब ,संगीता कदम,दिक्षा मोरजकर ,तैयसिम नावलेकर आदी बहुसंख्येने अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

   शाल , श्रीफळ,गुलाब झाड देत सत्कार करण्यात आला. तसेच लकी ड्रॉ पद्धतीने तिनं पारितोषिके चिट्टी पध्दतीने काढण्यात आली आहे यामध्ये भारती कांडर,अपूर्वा बाळा परब शांती चिके अनुक्रमे पारितोषिके मिळाली आहेत.

      कार्यक्रम सुत्रसंचलन व आभार सानिका तांबे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today