सिंधुदुर्ग today
नांदगावच्या नवनिर्वाचित पोलीस पाटील सौ. वृषाली ऋषिकेश मोरजकर यांना नियुक्ती प्रदान.
कणकवली प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील नांदगाव पोलीस पाटील पदी नांदगाव येथील सौ. वृषाली ऋषिकेश मोरजकर यांची नियुक्ती नुकतीच जाहीर करण्यात आली होती. आज गणेश चतुर्थी दिवशीच उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या कडून प्राप्त झालेल्या नियुक्ती पत्र कासार्डे पोलीस दूर क्षेत्राचे पोलिस हवालदार चंद्रकांत झोरे यांनी प्रदान केले आहे.
यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, पत्रकार तथा मोरजकर ट्रस्ट चे अध्यक्ष ऋषिकेश मोरजकर, संजय मोरजकर ,दिपक मोरजकर, जनार्दन मोरजकर ,अक्षय मोरजकर उपस्थित होते.
नांदगाव चा गेले वर्षभर बावशी येथील पोलिस पाटील समिर मयेकर यांच्या जवळ अतिरिक्त कार्यभार होता आता नव्याने कायमस्वरूपी कायमस्वरूपी पोलीस पाटील नांदगाव ला मिळाल्याने नांदगाव ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात असून नवनिर्वाचित पोलीस पाटील वृषाली ऋषिकेश मोरजकर यांचे अभिनंदन केले जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा