सिंधुदुर्ग today
फ्लोरेट काॅलेजच्या वतीने जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन
कणकवली : (ऋषिकेश मोरजकर)
महात्मा गांधी जयंती आणि स्वच्छता पंधरवडा या दिनाचे औचित्य साधून कणकवली येथील फ्लोरेट काॅलेज ऑफ फॅशन ॲण्ड डिझाईनिंग आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वच्छता ही आपल्या दैनंदिन जीवनात महत्वपूर्ण बाब आहे.संपूर्ण स्वच्छतेमुळे आपले वैयक्तिक आरोग्य सुधारते,पण त्याचबरोबर सामाजिक स्वास्थही राखले जाते. महात्मा गांधींचा स्वच्छतेचा संदेश तळागाळात रुजावा यासाठी अनेक संस्थांच्या वतीने समाजाभिमुख उपक्रम घेतले जातात.शासनाने सुद्धा स्वच्छता पंधरवडा आयोजित करून जनमानसात स्वच्छतेविषयी जाणीवजागृती व्हावी यासाठी या पंधरवड्यात अनेक उपक्रमांचे आयोजन केले आहे.
येथील फ्लोरेट काॅलेजच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि विशेषतः चित्रकलेची अभिरूची असलेल्या कलावंतांना त्यांच्या अभिवृत्तीला आणि कलात्मक सृजनशीलतेला प्रोत्साहन मिळावे यासाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
स्पर्धेचे नियम खालील प्रमाणे-
१) सदर स्पर्धा प्रत्यक्ष काॅलेजमध्ये घेतली जाईल.
२) स्पर्धा गट -महाविद्यालयीन असेल
३) स्पर्धकांनी स्वतःचे रंगसाहित्य आणावे.
४) चित्रासाठी कागद आयोजकांकडून पुरवला जाईल.
५) स्पर्धेची प्रवेश नोंदणी फी ५०/- ₹ राहिल.
६)स्पर्धेची तारीख -२ ऑक्टोबर २०२४
७) स्पर्धेचे ठिकाण -फ्लोरेट काॅलेज कणकवली,
स्पर्धेचे विषय:
१) स्वच्छता जिथे घरोघरी,आरोग्य तिथे काम करी
२)स्वच्छतेचे उपासक :महात्मा गांधी
३) म.गांधींच्या स्वप्नातला भारत
४) ग्राम स्वच्छता: काळाची गरज
५) प्रगतीचा ध्यास..खेड्यांचा विकास
वरील कोणत्याही एका विषयावर चित्र काढून रंगविणे.
पहिल्या पाच उत्कृष्ट चित्रांना संस्थेच्या वतीने रोख रक्कम आणि प्रमाणपत्र दिले जाईल.
अधिक माहितीसाठी संपर्क तरी जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन संस्थेचे.........यांनी केले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी कॉलेज एडमिन दीक्षा राणे 8421449590यांच्याशी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा