सिंधुदुर्ग today



नांदगाव ग्रामपंचायत येथील मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद 

नांदगाव ( ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत, एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज लाईफटाईम हॉस्पिटल पडवे आणि सरस्वती नर्सिंग कॉलेज तोंडवली यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले यावेळी नांदगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

       या शिबिराचे उद्घाटन  किडनी रोग तज्ञ डॉ प्रकाश घोगळे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले आहे.

शिबिरामध्ये हृदयरोग तपासणी ,कर्करोग तपासणी ,नेफ्रोलॉजि तपासणी, दंतरोग तपासणी ,नेत्ररोग तपासणी ,अस्थिरोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी आरोग्य शिबिरामधील  चाचण्या लघवी तपासणी ,रक्त तपासणी, थायरॉईड तपासणी ,शुगर तपासणी ,ECG (छातीची पट्टी),कर्करोग चाचणी करून मोफत औषधे उपलब्ध करण्यात आले आहे.

       यावेळी नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच इरफान साटविलकर, नांदगाव माजी सरपंच संजय पाटील,असलदे माजी सरपंच पंढरी वायंगणकर,आयनल माजी सरपंच बापू फाटक, किडनी रोग तज्ञ डॉ प्रकाश घोगळे , अस्थिरोग तज्ञ डॉ.योगेश केंद्र, नेत्ररोग तज्ञ डॉ निलेश मेत्रे , नर्सिंग कॉलेज तोंडवली चे श्रीमंत खरात, सागर भोसले,नांदगाव ग्रामपंचायत अधिकारी आर.डी.सावंत,ग्रामपंचायत सदस्य विठोबा कांदळकर , प्रदीप हरमळकर विजय आचरेकर ,राजू तांबे,श्रीराम मोरजकर, दिपक मोरजकर कमलेश पाटील, प्रदीप हरमळकर आदी बहुसंख्येने उपस्थित होते.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today