सिंधुदुर्ग today
नांदगावात अनंत चतुर्दशी निमित्त आज १०४ घरगुती गणपती विसर्जन
नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)
कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे आज घरगुती अनंत चतुर्दशी निमित्त गणपती विसर्जन उत्साहात संपन्न झाले आहे. नांदगाव येथे एकूण १०४ घरगुती गणपती बाप्पा चे थाटात विसर्जन करण्यात आले आहे. गणपती बाप्पा मोरया... मंगल मूर्ती मोरया ... पुढच्या वर्षी लवकर या... या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा