सिंधुदुर्ग today

 


नांदगाव ग्रामपंचायत व एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज लाईफटाईम हॉस्पिटल पडवे च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

नांदगाव /प्रतिनिधी

नांदगाव ग्रामपंचायत व एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज अँड लाईफटाईम हॉस्पिटल, पडवे यांच्यावतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर शनिवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते २ पर्यंत ग्रामपंचायत नांदगाव येथे आयोजित करण्यात आले असून शिबिरामध्ये   खालीलप्रमाणे सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
हृदयरोग तपासणी ,कर्करोग तपासणी ,नेफ्रोलॉजि तपासणी, दंतरोग तपासणी ,नेत्ररोग तपासणी ,अस्थिरोग तपासणी, स्त्रीरोग तपासणी
*आरोग्य शिबिरामधील उपलब्ध चाचण्या* लघवी तपासणी ,रक्त तपासणी, थायरॉईड तपासणी ,शुगर तपासणी ,ECG (छातीची पट्टी),
कर्करोग चाचणी
तसेच मोफत औषधे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक विष्णु गोसावी- ७८७५१३९५७९, सरपंच भाई मोरजकर -९८५०२३५७२३, कमलेश पाटील ७५०७६२६६५३ या क्रमांकावर संपर्क साधून
नांदगाव पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी सहभागी होवून या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today