सिंधुदुर्ग today

 




नांदगाव येथे ईद ए मिलाद निमित्त विविध कार्यक्रम 

आशिकाने मुस्तफा सिरत कमिटी तर्फे आयोजन 

नांदगाव ( ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे ईद ए मिलाद निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आशिकाने मुस्तफा सिरत कमिटी तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.रविवार दिनांक सकाळी ९.३० ते दुपारी १ पर्यंत भव्य रक्तदान शिबिर, मोफत आरोग्य शिबीर ,१० वी १२ वी विद्यार्थ्यांचा सत्कार, नांदगाव नवनिर्वाचित पोलीस पाटील यांचा सत्कार समारंभ नांदगाव तिठा येथील उर्दू शाळा येथे आयोजित करण्यात आला आहे.

      संजीवनी हॉस्पिटलचे डॉ तायशेटे यांच्या संकल्पनेतून नांदगाव येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे यामध्ये रक्त सर्व प्रकारची तपासणी,हिमोग्लोबिन, डायबिटीस,कोलेस्ट्रॉल , लघवी, ईसिजी तसेच लायन्स क्लब तर्फे मोफत नेत्र तपासणी आदी सर्व तपासणी मोफत  केली जाणार आहे तरी  सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कमेटी कडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today