सिंधुदुर्ग today



असलदे गावात गोवा बनावट दारु विक्री करणाऱ्यांना ग्रामस्थांचा दणका..

गावात दारुबंदी असताना दारु विक्रीची हिम्मत कशी करता? ; पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर दारु विक्रेत्यांना जाब विचारत दिली समज..

कणकवली : असलदे गावात दारूबंदी असताना गोवा बनावटीची अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात ग्रामस्थांनी मंगळवारी आक्रमक भूमिका घेतली आहे, नुकत्याच झालेल्या पोलिस कारवाईनंतर संबंधितांना जाब विचारत चांगलीच समज दिली. गावातील शांतता, सामाजिक वातावरण आणि युवकांचे भविष्य धोक्यात घालणाऱ्या अवैध दारू विक्रीला ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शविला आहे.यावेळी संशयित आरोपी अवधूत शामसुंदर वाळके या अवैध दारू विक्री करणाऱ्या इसमाने दारू विक्री करत असल्याची कबुली देत असलदे गावाची माफी मागितली. यापुढे गावात दारु विक्री करणारे नसल्याचे माफी मागत जाहीरपणे सांगितले आहे.

असलदे शिवाजीनगर येथे आरोपी अवधूत शामसुंदर वाळके यांच्या गोडाऊन कणकवली पोलिसांनी ७ जून रोजी रात्री १२.३० धाड टाकली. यानंतर गावात ग्रामसभेमध्ये दारूबंदी चा ठराव असताना देखील अवैध दारूचा व्यवसाय होत असल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. याबाबत मंगळवारी रात्री संशयित आरोपी अवधूत शामसुंदर वाळके तर सुरेंद्र वायंगणकर याला फोन करत कडक शब्दात दारू व्यवसाय बंद करण्याचा इशारा दिला आहे. 

यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे, पत्रकार भगवान लोके, नरेंद्र हडकर,उपसरपंच सचिन परब,व्हाइस चेअरमन दयानंद हडकर,सोसायटी संचालके शत्रुघ्न डामरे,माजी सरपंच पंढरी वायंगणकर,महेश लोके, रघुनाथ लोके,प्रवीण डगरे,प्रदीप हरमलकर ,विजय आचरेकर,मनोज लोके,संदेश आचरेकर,अनिल लोके,दयानंद डगरे,विजय खरात, रुपेश खरात,गोविंद लोके,संतोष घाडी,संतोष डामरे,विष्णू डगरे,राजू जेठे,संदीप नरे ,प्रमोद डामरे आदींसह गावातील ग्रामस्थ  उपस्थित होते.

दारू विक्री करणाऱ्यांना विचारला जाब

 तुमच्यासारख्या लोकांमुळेच अनेक संसार उद्धवस्त झाले  असल्याचा आरोप सरपंच चंद्रकांत डामरे, पत्रकार भगवान लोके, नरेंद्र हडकर, शत्रुघ्न डामरे,महेश लोके, दयानंद हडकर यांच्यासह ग्रामस्थांनी करत जाब विचारला .यावेळी दारूबंदी ही झालीच पाहिजे नाहीतर असलदे गाव गप्प बसणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन - भगवान लोके

नांदगाव दशक्रोशीतील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये, तसेच गावातील सामाजिक सलोखा अबाधित राहावा, यासाठी असलदे ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र,काही व्यक्ती आर्थिक फायद्यासाठी गावाच्या निर्णयालाच हरताळ फासत आहेत. त्यांना गावातील सरपंच चंद्रकांत डामरे व ग्रामस्थांनी योग्य त्या शब्दात समज दिलेली आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्या संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अन्यथा पोलिसांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल,असा इशारा पत्रकार भगवान लोके यांनी केली आहे.

दारूबंदी असताना दारु विक्री केल्यास गप्प बसणार नाही - चंद्रकांत डामरे 

असलदे गावात अवैध दारू विक्री, वाहतूक किंवा साठा आढळल्याने संशयित आरोपी अवधूत वाळके यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दारू विक्री गावाच्या हिताविरोधात आहे. त्याबाबत गावातील ग्रामस्थ गोळा होऊन अवधूत वाळके आणि फोन द्वारे सुरेंद्र वायंगणकर याला आम्ही समज दिलेली आहे.त्यामुळे लवकरच पोलिसांची भेट घेऊन निवेदन दिले जाईल, आमच्या गावात दारूबंदी असताना जर कोण ठरावाला बाधा आणत असेल,तर आम्ही सहन करणार नाही.पोलिसांनी कठोर कारवाईची मागणी केली जाणार असल्याचे सरपंच चंद्रकांत डामरे यांनी सांगितले. 

पुन्हा गोवा बनावट दारुची विक्री करणार नाही-अवैध दारु फिरता..

मी असलदे गावामध्ये दारू विक्री करत होतो, माझ्याकडे दारूचा साठा असलदे गावात पोलिसांना आढळून आला.त्यानंतर गावातील सरपंच चंद्रकांत डामरे, पत्रकार भगवान लोके यांच्यासह ग्रामस्थांनी आम्हाला समज दिलेली आहे.  गावांमध्ये दारु बंदी आहे,त्यामुळे यापुढील काळात मी गोवा बनावटीची दारु विक्री करणार नाही, अशी कबुली ग्रामस्थांना अवैध गोवा बनावटीची दारु विक्रेता अवधूत वाळके याने दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today