सिंधुदुर्ग today
नाम. नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव येथे वृक्षारोपण
नांदगाव /प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त नांदगाव येथे मोठ्या उत्साहाने विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टी कणकवली चे प्रमुख कार्यकर्ता रज्जाक बटवाले यांनी जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु शाळा नांदगाव येथे वॄक्षारोपण केले व शाळेच्या सर्व मुलांना मिठाईचे वाटप करण्यात आले.
यावेळी अकबर बटवाले जाहीर बटवाले शाळेचे शिक्षक तारीख अन्वर खान ऐनोदिन शेख आदी उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा