सिंधुदुर्ग today



कवी अजय कांडर यांचे कवीचा वर्तमान हस्तक्षेप विषयावर व्याख्यान

श्रीरामपूर सहजानंद भारती कॉलेजतर्फे १६ रोजी आयोजन 

कणकवली/प्रतिनिधी

     स्वामी सहजानंद भारती कॉलेज अहिल्यानगर श्रीरामपूरतर्फे 16 जून रोजी रात्री 9 वा. कवी अजय कांडर यांचे ' कवीचा वर्तमान हस्तक्षेप' या विषयावर ऑनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. 

    श्रीरामपूर सहजानंद भारती कॉलेजतर्फे विविध व्याख्याने सातत्याने आयोजित केली जातात. समाजाची वैचारिक बैठक पक्की व्हावी आणि नवी पिढी वैचारिक दृष्ट्या समृद्ध व्हावी या विचाराने वेगवेगळे विषय व्याख्यानासाठी निवडले जातात आणि त्या विषयाचे तज्ञ व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केले जातात. आजवरच्या व्याख्यानात साहित्य,संगीत, कला, समाज जीवन,सांस्कृतिक जीवन या विषयातील तज्ञ अभ्यासकांना निमंत्रित करून व्याक्याने आयोजित केली गेली. यावेळी कवी- लेखकाची जबाबदारी काय असते ? समाजात त्याचा हस्तक्षेप काय असतो? हा हस्तक्षेप करताना कवी आपली सामाजिक बांधिलकी कोणती मानतो, त्याचबरोबर कवीने लेखन करणे म्हणजे कोणत्या प्रकारची जोखीम पथककरणे आदी मुद्द्याच्या अनुषंगाने मांडणी करण्यासाठी 'कवीचा वर्तमान हस्तक्षेप' या विषयावर कवी अजय कांडर यांचे सदर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कवी अजय कांडर हे मराठीतील महत्त्वाचे कवी असून एक व्याख्याते म्हणूनही ते सुपरीचीत आहेत. आजवर त्यांची विविध व्याख्याने महाराष्ट्राच्या विविध भागात तसेच विद्यापीठांमध्ये आयोजित केली गेली आहेत. तरी या ऑनलाइन व्याख्यानाचा रसिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन कार्यक्रमाचे समन्वय डॉ. भागवत शिंदे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today