सिंधुदुर्ग today



नांदगाव तिठा फोंडा रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य दोन दुचाकीस्वारांचा अपघात. 

नांदगाव फोंडा रोड वरील रस्ता कारणांमुळे पसरले चिखलाचे साम्राज्य. 

माजी सरपंच आफ्रोजा नावलेकर यांचा आंदोलनाचा इशारा.

नांदगाव (ऋषिकेश मोरजकर)

कणकवली तालुक्यातील नांदगाव फोंडा रस्त्याचे काम गेल्या दीड ते दोन वर्षापासून सुरू आहे आता नांदगाव तिठा सुरू होतो या जवळच काम येऊन थांबल्याने त्या ठिकाणी पूर्ण चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पहिल्याच पावसाने एवढी दलदल झालेली आहे की, येणार जाणाऱ्या वाहनांने, दुचाकीस्वार घसरुन पडून जखमी होत आहेत. तर येथून त्या दलदलीमुळे चालणेही मुश्किलीचे झाले आहे.

तरी सदर दलदलीवर त्वरित खडी टाकून दलदल दूर करावी अन्यथा येथे आठ दिवस सात आंदोलन छेडले जाईल असा इशारा नांदगाव माजी सरपंच आफ्रोजा नावलेकर यांनी दिला आहे.

   दलदल मुळे अपघातग्रस्तांना मदत करताना अडथळे 

काल सायंकाळी उशिरा आफ्रोजा नावलेकर या कोल्हापूर हून येत असताना त्यांना रस्त्यावर दोन दुचाकीस्वार पडलेले दिसले त्यांना स्थानिक ग्रामस्थ यांनी मदत करत उपचारासाठी दाखल केले . पण त्यांना मदत करताना ही सदर चिखलामुळे पाय घसरत असल्याचे प्रत्यक्षदर्शी असलेले माजी सरपंच आफ्रोजा नावलेकर यांनी बोलताना सांगितले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today