सिंधुदुर्ग today

 


नांदगाव अवैध दारू धंद्याबाबत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले होते जिल्हा पोलीस अधीक्षकांना सक्त कारवाईचे आदेश.

पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर झाली त्वरित कडक कारवाई सरपंच रविराज मोरजकर यांनी मानले पालकमंत्र्यांचे आभार.

नांदगाव / प्रतिनिधी 

कणकवली तालुक्यातील नांदगाव तिठा उड्डाणपुलाखाली  राजरोस पणे अवैध गोवा बनावट दारूची विक्री होत होती . याबाबत वारंवार पोलीस खात्याकडे तक्रार करून सुद्धा ठोस कारवाई होत नव्हती , याबाबत पालकमंत्री नितेश राणे  यांच्याकडे नांदगाव सरपंच रविराज मोरजकर यांनी तक्रार केली होती. त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक ओरोस यांच्या जवळ याबाबत नाराजी व्यक्त करून सरपंच गावाच्या वतीने ग्रामसभेच्या ठरावांची प्रत देऊन तुमच्याकडे या अवैध दारू धंद्याबाबत कारवाई करण्याची मागणी करत असताना कडक कारवाई का होत नाही ? अशी विचारणा केली आणि त्वरित हे अवैध दारू धंदे बंद झालेच पाहिजेत असा सक्त आदेश दिला होता. पालकमंत्र्यांची नाराजी,तसेच ठोस कारवाईचे आदेश प्राप्त झाल्यानंतर पोलीस निरीक्षक कणकवली व त्यांच्या सहकाऱ्यांनी लगेचच रात्री साडेबारा वाजता छापा टाकून संशयित आरोपी अवधूत वाळके याचे वर कारवाई केली.

         वाळके, वायंगणकर हे दोन्ही ही नांदगावच्या शेजारील असलदे गावात राहतात त्या दोघांनाही असलदे ग्रामस्थानी अवैध दारू विक्री बंद करा आणि आमच्या गावाची बदनामी थांबवा असा सज्जड दम दिला आहे.असलदे ग्रामस्थांच्या या निर्णयाचे नांदगाव सरपंच म्हणून गावाच्या वतीने  स्वागत करतो दोन्ही संशयितांना जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून अप्पर पोलिस अधीक्षक नयोमी साटम यांनी सज्जड दम दिला असून दोघांकडून पन्नास हजार रुपयांचे बंध पत्र लिहून घेण्यात आले असल्याचे नांदगाव सरपंच भाई मोरजकर यांनी सांगितले आहे. तसेच दोन्ही आरोपींना दररोज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय ओरोस येथे हजेरी लावणे बाबत आदेश देण्यात आले आहेत.या दोन्ही कारवाईमुळे  सद्यस्थितीमध्ये अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद आहे.अवैध दारू विक्री बंद झाल्यामुळे नांदगाव सरपंच रविराज मोरजकर आणि ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. सर्वांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today

सिंधुदुर्ग today